सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर च्या वतीने आयोजित ही स्पर्धा प्रभात रोड येथील सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू आहे. या स्पर्धेत मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित अनुज फुलसुंदर याने चौथ्या मानांकित स्वरूप भाडळकरचा ११-६, ६-११, ११-७, ११-७, ११-१३, ११-७ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत अनुजने तिसऱ्या मानांकित निषाद लेलेचा ११-५, ८-११, ८-११, ११-८, ११-८ असा पराभव केला. अनुज सिम्बायोसिस स्कूलमध्ये दहावीत शिकत असून, पीवायसी टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक दीपेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. यानंतर मुलींच्या गटात अंतिम सामन्यात रुचिता धारवटकर हिने दिया शिंदेचा ११-६, ११-८, ११-४, ११-६ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. रुचिता एस. पी. कॉलेजमध्ये बारावीत वाणिज्य शाखेत शिकत असून, इंडिया खेलेगा टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक सन्मय परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
उपांत्यपूर्व फेरीचे निकाल : १९ वर्षांखालील मुले - प्रणव घोलकर वि. वि. आर्यन वानखेडे ९-११, ११-६, ११-२, ११-९; स्वरूप भाडळकर वि. वि. सिद्धार्थ पॉल ११-६, ११-९, ११-३; निषाद लेले वि. वि. शारंग गवळी ११-८, ११-५, ११-८; अनुज फुलसुंदर वि. वि. अद्वैय हुद्दर ११-६, ११-८, ८-११, ११-७. मुली - रुचिता धारवटकर वि. वि. जान्हवी फणसे ११-३, ११-६, ११-४, ११-७; सई कुलकर्णी वि. वि. निधी भांडारकर ११-७, ८-११, ११-३, ११-१३, ११-८; दिया शिंदे वि. वि. नीरजा देशमुख ११-७, ११-७, ११-६; तनया अभ्यंकर वि. वि. आद्या गवत्रे ११-७, ११-७, ९-११, ११-८.



