भिशीचे साडेसोळा लाख हडपले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
bhishees crore scam the 165 lakh fraud
नागपूर : कपिलनगर पोलिसांनी भिशीचे १६ लाख ५५ हजार रुपये हडपल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुरुप्रीतसिंग मनजितसिंग वाडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. किरण नारायण देवगडे (वय ३२, रा. ज्ञानेश्वरनगर, मानेवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. जुलै २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत किरण यांनी वाडे याच्याकडे भिशीचे पाच लाख ५६ हजार रुपये जमा केले. तसेच नीरज यांनी आठ लाख ४९ हजार रुपये, तर प्रशांत गावंडे यांनी अडीच लाख रुपये जमा केले. अशाप्रकारे एकूण १६ लाख ५५ हजार रुपये जमा करण्यात आले होते. वाडे याने ही रक्कम हडपल्याचा आरोप आहे. याप्रकरणी किरण यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.