Indian Culture An Innovative Thought Without Unilateralism
एकांगी नसल्याने भारतीय संस्कृती अभिनव
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘ भारतीय संस्कृती सर्वांना सोबत घेऊन चालणारी आणि सर्वांचे कल्याण होवो, अशी कामना व्यक्त करणारी आहे. त्यात एकांगी विचार नसल्याने ती इतर संस्कृतींपेक्षा निराळी आणि अभिनव आहे,’ असे मत मुंबई विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्राची मोघे यांनी व्यक्त केले.
बाबासाहेब आपटे स्मारक समितीतर्फे बाबासाहेब आपटे जयंती उत्सवाचे आयोजन शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले होते. यावेळी डॉ. प्राची मोघे यांचे ‘भारतीय संस्कृती : शाश्वत प्रवाह’ या विषयावर व्याख्यान झाले.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मानव विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी, बाबासाहेब आपटे स्मारक समितीचे अध्यक्ष सुधीर दप्तरी आणि सचिव प्रशांत व्यास उपस्थित होते.
‘अनेक लोकांनी हल्ले करूनही आपण आपल्या संस्कृतीशी आजही जुळलेलो आहोत, हीच तिची शाश्वतता आहे,’ असे डॉ. श्याम कोरेटी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर दप्तरी यांनी केले. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात साक्षी लोखंडे, वर्धा; स्नेहा गेडाम, काटोल; मीरा दुपारे, रक्षा फटिंग, पुनित कौर, भीमराव नागदेवे, कृतिका जैन आणि वीरती गाला यांचा समावेश होता. सूत्रसंचालन हेमंत खानझोडे आणि मिश्रा यांनी केले. आभार हिमांशू उमाळकर यांनी मानले.