पुण्याचा राजनदुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
punyas rajan yadav secures second place in thane marathon
ठाणे : पुण्याच्या राजन यादवने ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या खुल्या गटात दुसरा क्रमांक पटकावला. २१ किलोमीटरची ही शर्यत कोल्हापूरच्या प्रवीण कांबळेने जिंकली. महिलांमध्ये नाशिकच्या रवीना गायकवाडने बाजी मारली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. या स्पर्धेत सुमारे ३० हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद लुटला. सहा वर्षांनंतर ही मॅरेथॉन झाली. यात पुरुषांमध्ये प्रवीणने १ तास ७ मिनिटे आणि २१ सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकावला. नाशिकचा कालिदास हिरवे तिसऱ्या क्रमांकावर राहिला. महिलांच्या २१ किलोमीटर अर्धमॅरेथॉनमध्ये रवीनाने १ तास २६ मिनिटे आणि ४ सेकंद वेळ देऊन अव्वल क्रमांक पटकावला. तिने तेजस्विनी लामकानेला मागे टाकले. पुण्याची साक्षी कसबे तिसऱ्या क्रमांकावर राहिली.