खेळण्याबाबत पाकिस्तान ‘यू टर्न’ घेणार?

महाराष्ट्र टाइम्स

पाकिस्तान भारताविरुद्धच्या वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळणार की नाही यावर यू टर्न घेण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) उपाध्यक्ष इमरान ख्वाजा लाहोरमध्ये दाखल झाले आहेत. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (पीसीबी) चर्चा करत आहेत. रविवारी होणाऱ्या बैठकीआधी ते बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनाही भेटणार आहेत. या चर्चेतून तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.

खेळण्याबाबत पाकिस्तान ‘यू टर्न’ घेणार?
भारताविरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप सामन्यात न खेळण्याच्या आपल्या भूमिकेवर पाकिस्तान यू टर्न घेण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) उपाध्यक्ष इमरान ख्वाजा लाहोरमध्ये दाखल झाले आहेत. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (पीसीबी) चर्चा करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा गेल्या काही दिवसांपासून पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याशी बोलत आहेत. रविवारी लाहोरमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी ख्वाजा पीसीबी प्रमुख नक्वी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांच्याशी चर्चा करणार आहेत. अमीनुल इस्लाम यांनी रविवारी नक्वी यांची भेट घेतली.