‘व्यावसायिक’ला पसंती

Contributed byहर्ष दुधेharsh.dudhe@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सीईटी परीक्षांसाठी आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. इंजिनीअरिंग आणि एमबीएसाठी दोनदा परीक्षा होणार आहे. मुलींना १०० टक्के शुल्क सवलत आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. यामुळे सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढेल. खासगी विद्यापीठांना यामुळे आव्हान निर्माण होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.

‘व्यावसायिक’ला पसंती

पुणे : ‘सीईटी सेल’कडून यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांच्या नोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे इंजिनीअरिंग आणि एमबीए प्रवेशासाठी दोन वेळा सीईटी होत असल्याने, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

यंदाची नोंदणी प्रक्रिया ही खासगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेच्या बरोबरीनेच सुरू झाली आहे. त्यातच मुलींना मिळणारी १०० टक्के शुल्क सवलत, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेच्या लाभामुळे यंदा सरकारी विद्यापीठांशी संलग्न व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढून खासगी विद्यापीठांपुढे आव्हान निर्माण होणार आहे. सीईटी सेलने यंदा वेळापत्रकात केलेल्या बदलामुळे प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. इंजिनीअरिंग, एमबीए , फार्मसी, लॉ, कृषी, बीएड, नर्सिंग, बीपीएड आदी अभ्यासक्रमांसाठी सीईटी नोंदणी जानेवारीत सुरू केली आहे.

सीईटी नोंदणी प्रक्रियेतील बदल, परीक्षा दोन वेळा घेण्याचा निर्णय आणि सरकारी सवलती यांचा एकत्रित परिणाम म्हणून यंदा राज्यातील व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचा बदल घडताना दिसत आहे. परीक्षा दोन वेळा होणार असल्याने विद्यार्थ्यांना संधी वाढली असून, सरकारी सवलतींमुळे सीईटीमार्फत प्रवेश घेण्याचा कल वाढत आहे. याचा थेट परिणाम खासगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेवर होणार असल्याचे चित्र आहे. येत्या काळात प्रवेश प्रक्रियेत खासगी विद्यापीठ आणि सरकारी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीची स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.