स्लॅब कोसळून दोन जण जखमी

महाराष्ट्र टाइम्स

खारमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोन जण जखमी झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. निरव निसार आणि हर्ष पोरवाल हे दोघे लिंकिंग रोडवर उभे असताना हा स्लॅब त्यांच्यावर पडला. हर्ष गंभीर जखमी झाला असून निरवला किरकोळ दुखापत झाली. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी इमारतीच्या मालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

two injured as building slab collapses in khar

खार येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी खार पोलिसांनी निष्काळजीचा ठपका ठेवत इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हार्डवेअरचा व्यवसाय करणारे निरव निसार हे मित्र हर्ष पोरवाल याच्यासोबत शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चालले होते. लिंकिंग रोडवरील केएफसी जंक्शनजवळ उभे असताना बाजूला असलेल्या ‘कदंब कुडपी’ या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब त्यांच्यावर पडला.

हर्ष पोरवाल याच्या डोक्यावर, पाठीवर, चेहऱ्यावर आणि हातावर सिमेंट ब्लॉक पडल्याने तो गंभीर जखमी झाला तर निरव याला किरकोळ दुखापत झाली.

दोन्ही जखमींवर आधी वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर दोघांना ब्रीच कॅण्डी या रुग्णालयात हलविण्यात आले. नीरव याच्या तक्रारीवरून पोलिसांकडून 'कदंब कुडपी' इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.