धार्मिकस्थळाच्या बांधकामाचा त्रास

महाराष्ट्र टाइम्स

वागळे इस्टेटमधील रुपादेवी पाडा क्रमांक दोन येथे धार्मिक स्थळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे एका कुटुंबाला त्रास होत आहे. त्यांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. नागरिकांची वहिवाट बंद झाल्याचेही सांगण्यात आले आहे. हे उपोषण बेमुदत सुरू आहे.

धार्मिकस्थळाच्या बांधकामाचा त्रास
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

वागळे इस्टेट येथील रुपादेवी पाडा क्रमांक दोन भागात धार्मिक स्थळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा फटका स्थानिक कुटुंबाला बसत आहे. या बांधकामाविरोधात संबंधित कुटुंबाने ठाणे पालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ठाणे महापालिका प्रशासनाकडे याप्रश्नी वारंवार तक्रार देऊनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप या पीडित कुटुंबाने केला आहे.

धार्मिकस्थळाचे बेकायदा विस्तारीकरण सुरु असल्याचा आरोप उपोषणकर्त्या रवींद्र गुप्ता यांनी केला. या कामादरम्यान नागरिकांची वहिवाट बंद करण्यात आली आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. त्यांनी याप्रश्नी २०२२पासून तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप केला. अखेर गुप्ता कुटुंबीयांनी ठाणे महापालिकेसमोरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, याबाबत पालिका प्रशासनाशी संपर्क साधूनही होऊ शकलेला नाही.