ठाण्यातील बाळकुम परिसरात एका गोदामाला रविवारी रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत मोबाइल टॉवर केबल, वायफाय केबल आणि फायबर चेंबरसह इंटरनेट साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ठाणे: बाळकुम परिसरात एका गोदामाला रविवारी रात्री आग लागली. या आगीत मोबाइल टॉवर केबल, वायफाय केबल आणि फायबर चेंबरसारखे इंटरनेट साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बाळकुम पाडा क्रमांक १ येथील पत्र्याच्या शेडमध्ये हे गोदाम होते. आग लागल्याची माहिती मिळताच बाळकुम अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. बाळकुम अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी ओंकार वैती यांच्या टीमने आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी मिळून ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत मोठे नुकसान झाले असले तरी, जीवितहानी टाळण्यात यश आले.