‘लकी ड्रॉ’मधूनलाखोंची फसवणूक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
millions swindled in niphads lucky draw
निफाड : शहरात श्री साई एंटरप्राइजेसच्या लकी ड्रॉ स्कीममध्ये फसवणूक झाल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. स्कॉर्पिओ, बुलेट, मोटारसायकल, मोपेड, ट्रॅक्टर, कूलर व शेतीपयोगी वस्तूंची बक्षिसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले.

प्रत्येकी १५०० रुपये घेऊन जिल्ह्यातील निफाड, चांदवड, दिंडोरी, येवला, सिन्नर, पेठ आदी तालुक्यांतून एजंटमार्फत ग्राहक जोडले होते. रविवारी सोडत काढताना जाहीर झालेल्या नावांपैकी कोणीही उपस्थित नसल्याने ग्राहकांनी आयोजकांना जाब विचारला. गोंधळात पोलिस येताच संचालक फरार झाले.