मखमलाबादची ग्रीनफिल्ड टीपी स्कीम अखेर रद्द

Contributed byनाशिक,आमदार|महाराष्ट्र टाइम्स
makhamalabad greenfield tp scheme cancelled farmers relieved
मखमलाबाद शिवारातील ७५३ एकर क्षेत्रावर हरित विकास क्षेत्राअंतर्गत प्रस्तावित नगररचना योजना (ग्रीनफिल्ड टीपी स्कीम) रद्द करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी याप्रश्नी पाठपुरावा केला होता.

मखमलाबाद व हनुमानवाडी शिवारातील ७५३ एकर जागेवर नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीमार्फत २०१९ मध्ये हरित क्षेत्र विकास योजना प्रस्तावित केली होती. या योजनेला प्रस्तावित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. योजना रद्द करण्याबाबत आमदार फरांदे यांना साकडे घातले होते. फरांदे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.