सततच्या पावसामुळे शेतातील काढणी आणि वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भाजीपाल्याची आवक निम्म्याहून अधिक घटल्याने दरवाढ झाल्याची स्थिती आहे. शेतात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी भाजीपाला काढणी थांबली आहे. उपलब्ध भाजीपाल्याची वाहतूकही संथ झाली आहे. त्यातच नाशिकमधून मुंबई, गुजरातसह अन्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पाठविला जात असल्याने स्थानिक बाजारातील उपलब्धता आणखी कमी झाली आहे. याचा थेट परिणाम किरकोळ दरांवर झाला असून, महिनाभरापूर्वी काही प्रमाणात स्थिरावलेले दर पुन्हा वाढले आहेत. सध्या किरकोळ बाजारात शेवगा, गवार, गिलके, दोडके, शिमला मिरची, कारले, तोंडली आदी भाज्या प्रतिकिलो शंभरीत गेल्या आहेत. भेंडी आणि हिरवी मिरची ८० रुपये प्रतिकिलोवर, तर भोपळा, कोबी आणि फ्लॉवरचा गड्डाही ३० रुपयांवर गेला आहे. आवक घटल्याने टोमॅटोही काही प्रमाणात महागला आहे.सततच्या पावसामुळे पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी कोथिंबिरीसह मेथी, पालक, शेपू, कांदापात यांसारख्या पिकांची काढणी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक घटून त्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीची मोठी जुडी शंभर रुपयांवर पोहोचली असून, किरकोळ बाजारात लहान जुडीसाठीही ग्राहकांना २० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. पालेभाज्यांचे दरही जुडीच्या आकारानुसार कमी-जास्त आहेत.