कारागृहात संघर्ष; २६ कैद्यांचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कारागृहात संघर्ष; २६ कैद्यांचा मृत्यू
श्रीलंकेतील पश्चिम किनारपट्टीवरील नेगोम्बो येथील कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात २६ कैद्यांचा मृत्यू झाला असून, १००हून अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. क्षमतेपेक्षा अधिक कैदी असलेल्या या कारागृहात रविवारी दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये हिंसक झटापट झाली होती. सोमवारीही काही कैद्यांनी कारागृहातील बंदुका ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा हिंसाचार उसळला. कारागृहातील अमली पदार्थांच्या तस्करीला पाठिंबा देणारा गट आणि त्याला विरोध करणाऱ्या गटामधील संघर्षातून हा हिंसाचार भडकला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.