The Importance Of Global Unity After Khameneis Death
‘खामेनींच्या निधनाने शिकवले एकतेचे महत्त्व’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
तेहरान : ‘इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या निधनाने लोकांना एकतेचे महत्त्व शिकवले आहे,’ असे प्रतिपादन इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी रविवारी केले.‘या हुतात्मा नेतृत्वाने सर्वांना हेच शिकवले, की इराणची सर्वांत मोठी संपत्ती तिची जनता आणि त्यांची एकता हीच आहे,’ असे पेझेश्कियान यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया मंचावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘सहानुभूती, सुसंवाद आणि जनतेची प्रामाणिक सेवा याद्वारे आपण इराणचा सन्मान, प्रगती आणि वैभवाचा मार्ग पुढे चालू ठेवू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.‘अल जझीरा’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी तेहरानमध्ये इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या शोककुल नागरिकांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची मागणी करणारे फलक हातात धरले होते. या अंत्ययात्रेतील छायाचित्रांमध्ये ‘किल ट्रम्प’ (ट्रम्प यांना ठार मारा) लिहिलेला एक बॅनर दिसत होता, ज्यामध्ये ‘ट्रम्प’ या शब्दावरून एक गोळी जाताना दाखवण्यात आली होती. इतर काही आंदोलकांनी अमेरिकेचे उपअध्यक्ष जे. डी. व्हान्स, अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या छायाचित्रांसह ‘देअर विल बी ब्लड’ (रक्तपात होईल) असे लिहिलेले फलक हातात घेतले होते. या अंत्यसंस्कार सोहळ्यात शोकगीत गाणारे महंमद रसुली यांनीही प्रक्षोभक वक्तव्ये केली. रविवारी खामेनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची प्रार्थना होण्यापूर्वी त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. ‘ज्याने माझ्या इमामाची आणि माझ्या नेत्याची हत्या केली, त्याला आपण का मारू नये,’ असा सवाल रसुली यांनी केला.