रशियाच्या युक्रेनवरीलहल्ल्यांत १८ मृत्युमुखी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
रशियाच्या युक्रेनवरीलहल्ल्यांत १८ मृत्युमुखी
कीव्ह : रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर सोमवारी पहाटे क्षेपणास्त्रे आणि ड्रोनहल्ले केले. त्यात किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यांमुळे युक्रेनची हवाई संरक्षण प्रणाली कमकुवत झाल्याचे अधोरेखित झाले आहे. युक्रेनने अलिकडे रशिया आणि रशियाव्याप्त क्रिमियामध्ये केलेल्या हल्ल्यांमुळे तेथील इंधनपुरवठ्यावर परिणाम होऊन अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर दबाव वाढला. त्यानंतर देशात हल्ले होण्याची शक्यता युक्रेनचे अध्यक्ष झिल्येन्स्की यांनी व्यक्त केली होती. ती खरी ठरवत रशियाने गुरुवारी कीव्हमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ रशियाने पुन्हा सोमवारी पहाटे कीव्हवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनहल्ले केले. या हल्ल्यांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला असून, ६० जण जखमी झाले. मात्र, कीव्हमधील शस्त्रास्त्रनिर्मिती कारखाने लक्ष्य करण्यात आल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.