नागपूर : ग्राहक म्हणून आलेल्या महिलेने वेळोवेळी ज्वेलर्समधून १३ लाख रुपये किमतीचे दागिने चोरी केले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी महिलेविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. मोनाली प्रमोद कावडकर रा.ब्रह्मनगर,असे आरोपी महिलेचे नाव आहे. साहिल अनिल डुंबरे (वय २७) रा. काशीनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला. साहिल यांचे काशीनगर भागात साहिल ज्वेलर्स आहे. मे महिन्यात मोनाली दुकानात आली. दागिने तयार करायचे असल्याचे सांगून नजर चुकवून दागिने चोरी करायची.