हिंसाचारप्रकरणी आणखी पाच अटकेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
five more arrested after rape and murder incident in kolkata
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात आणि पोलिसांवरील हल्ल्यात सामील असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे या हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या आता ३५ झाली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

बारुईपूर पोलिस जिल्हा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये गुरुवारी रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यांमध्ये या पाच जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
बारुईपूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की ‘पोलिसांचे छापे अजूनही सुरू असून, यात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. या हिंसाचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेची आम्ही कसून चौकशी करीत आहोत. या संपूर्ण गोंधळानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.