२५ लावणी नृत्यांगनांचा सांस्कृतिक सोहळा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
historic cultural event of 25 lavani dancers in nagpur
नागपूर : नागपूरच्या रसिकांसाठी प्रथमच पारंपरिक मराठमोळ्या लावणीचा भव्य सांस्कृतिक सोहळा ‘नाद घुंगराचा’ आयोजित करण्यात आला आहे. ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्था आणि मोर्यान डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात रंगणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन, निर्मिती आणि नृत्यदिग्दर्शन अभिनेत्री शिल्पा शाहिर यांनी केले आहे. त्यांच्या साथीला २५ लावणी नृत्यांगना , दमदार गायिका आणि थेट वाद्यवृंद असेल. ‘लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. आपल्या समृद्ध लोककलेचा वारसा जपण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. नागपूरच्या रसिकांनी परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा’, असे आवाहन शिल्पा शाहिर यांनी केले.