पिंपरी : राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सोहळ्यास आमदार शंकर जगताप, माजी खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, ‘प्राधिकरण’चे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. पी. डी. पाटील यांनी हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत भावनिक असल्याचे सांगितले. ‘हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून याचे श्रेय माझ्या सहकाऱ्यांना आणि समाजाला आहे,’ असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार नेते यशवंत भोसले यांनी; सूत्रसंचालन नंदू कदम यांनी केले. दिनेश पाटील, दीपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे, ओंकार देशपांडे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
‘क्षमता विकसित व्हावी’
पिंपरी : ‘विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पहावे आणि पाठ्यपुस्तकांशिवाय अवांतर ज्ञान मिळविणे, शिस्त, वृत्तपत्र वाचन, बाजारपेठेची समज आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उच्च शिक्षण घ्यावे,’ असे आवाहन उद्योजक आणि ‘टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज’चे संचालक शंकर जाधव यांनी केले. पिंपरी-चिंचवड विद्यापीठाच्या पुणे मॅनेजमेंट स्कूलमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ‘पीसीईटी’चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे, ‘पीसीयू’ गव्हर्निंग बोर्ड सदस्य सचिन इटकर, ‘पीसीयू’ ग्रुप मॅनेजमेंट प्रोग्राम सल्लागार डॉ. गणेश राव आदी उपस्थित होते.
‘...हेच यशाचे रहस्य’
पिंपरी : आमदार ‘अमित गोरखे यूथ फाउंडेशन’ च्या वतीने कठीण परिस्थितीवर मात करून ‘यूपीएससी’मध्ये १२५ वा क्रमांक पटकावणाऱ्या कबीर कांबळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी कबीर कांबळे बोलत होते. सोहळ्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे उपस्थित होते. कबीर कांबळे यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगितले, ‘‘यूपीएससी’सारख्या कठीण परीक्षेत केवळ एक टक्क्यांपेक्षा कमी उमेदवारांची निवड होते.
ग्रॅज्युएशननंतर मी स्वतः सलग अपयशी झालो होतो; मी नापास झालो, तरीही माझे आई-वडील आणि भावाने मला मिठाई भरवून माझा उत्साह वाढवला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्साह न गमावता सातत्याने कष्ट करण्याची तयारी ठेवायला हवी.’