Free Guidance Camp For Government Jobs Guidance From Competitive Exam Experts
सरकारी नोकरीसाठी मार्गदर्शन शिबीर
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
सरकारी नोकरीची तयारी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ‘स्प्रेडिंग नॉलेज’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ यांच्यातर्फे दोन दिवसीय ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यूपीएससी, एमपीएससी, बँक, रेल्वे, पोलिस, सीबीआय, इस्रो, नेट, महाराष्ट्र सरकारची फेलोशिप, संरक्षण दलांसह ४०हून अधिक सरकारी नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षांबाबत या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे.
वय वर्षे १८ ते ४० या वयोगटातील विद्यार्थी आणि नोकरीच्या संधी शोधणाऱ्या युवकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कोणत्या सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करता येतो, स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन, संदर्भ पुस्तके आणि तयारीची दिशा याविषयी शिबिरात माहिती दिली जाणार आहे.शिबिरात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षक दिनेश दांडगव्हाळ मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर २५ आणि २६ जुलै रोजी ऑनलाइन ‘झूम’द्वारे होणार असून, सहभागींसाठी ई-पुस्तक मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिबिर सशुल्क आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या सदस्यांना शुल्कात सवलत देण्यात आली आहे.