Puneet Balan Group Provides Essential Kits To Police
‘पुनीत बालन ग्रुप’तर्फे पोलिसांना किट
Contributed by: युवा उद्योजक|महाराष्ट्र टाइम्स•
पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुनीत बालन ग्रुपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे नऊ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये पोलिसांना पुढील काही दिवस उपयोगी पडतील असा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता.
येत्या १५ ते १९ जुलै या कालावधीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या मार्गावर तीन हजार महिला आणि पुरुष पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे; त्यांच्यासाठी तीन हजार कीट उपलब्ध करून देण्याची विनंती सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाने केली होती. पंढरपूर येथे आषाढीच्या बंदोबस्तासाठी आठ हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त असेल; त्यासाठी पंढरपूर उपविभागीय कार्यालयाने उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे किटसाठी विनंती केली होती. त्यानुसार बालन यांनी कीट उपलब्ध करून दिले आहेत.