पुणे : ‘संत निरंकारी मंडळा’च्या खडकी शाखेतर्फे दोन हजार वारकऱ्यांना चहा आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे डॉ. रंजीत भोसले व कर्मचारी सहभागी झाले. मंडळाचे शाखा प्रमुख मेजर सिंग रंधावा यांनी संयोजन केले. सेवा दलाने सहकार्य केले. संस्थेचे प्रमुख गणेश काची यांनी उपस्थितांचे आभार मानले.