Cm International School Secures Victory Against Amanora School In Subroto Mukherjee Cup
कुशलचा गोल; ‘सीएम’ची आगेकूच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : कुशल बागलेच्या एकमेव गोलच्या जोरावर सी. एम. इंटरनॅशनल स्कूलने १५ वर्षांखालील गटाच्या सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत हडपसरच्या अमनोरा स्कूलवर १-० अशी मात केली आणि उपांत्य फेरी गाठली.
उपांत्यपूर्व लढतीत आरिष जैनच्या गोलच्या जोरावर महंमदवाडीच्या दिल्ली पब्लिक स्कूलने जे. एन. पेटिट स्कूलवर १-० अशी, तर आरव चौधरी, अनस जमादार, क्रिश यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर हिलग्रीन स्कूलने कोथरूडच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलवर ३-० अशी मात केली. ‘एनआयबीएम’च्या विबग्योर स्कूलने नांदेड सिटीच्या पवार पब्लिक स्कूलचा टायब्रेकरअखेर ३-२ असा पराभव केला. निर्धारित वेळेअखेर गोलशून्य बरोबरीत सुटली. टायब्रेकरमध्ये विबग्योर संघाकडून विहान वलसारा, आरव शहा, अर्णव श्रीवास्तव यांनी गोल केले, तर पवार स्कूलकडून कार्तिक नवले, विराज पोकळे हे दोघेच गोल नोंदवू शकले.