H 1b Visas 100000 Fee Cancelled Supreme Courts Decision
‘एच-१ बी’ व्हिसाचेअतिरक्त शुल्क रद्दच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
वॉशिंग्टन : कुशल परदेशी कर्मचाऱ्यांसाठीच्या ‘एच-१ बी’ व्हिसावर एक लाख डॉलरचे (सुमारे ९६ लाख रुपये) शुल्क आकारण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय रद्द करण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. या आदेशाला स्थगिती देण्यास अमेरिकेतील उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने ट्रम्प सरकारची याचिका शुक्रवारी फेटाळली. न्यायालयाने आठ जून रोजी दिलेल्या निकालात ‘एच-१बी’ व्हिसावर आकारले जाणारे शुल्क म्हणजे अमेरिकी संसदेने मंजूर न केलेला बेकायदा कर असल्याचे म्हटले होते.
सविस्तर वृत्त...फ्रंट पेज २पुरीच्या यात्रेत भाविकाचा मृत्यू
पुरी : येथील बहुडा यात्रेदरम्यान सुभद्रा देवीचा रथ वाहणाऱ्या एका भाविकाचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. या मृताचे नाव अभिराम दास (५७) असे असून ते मूळचे कटक येथील रहिवासी होते. अभिराम यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता व त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. रथ वाहताना ते अचानक कोसळले,’ असे डॉक्टरांनी सांगितले. राज्य सरकारने दास यांच्या वारसांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यापूर्वी, १६ जुलै रोजी या यात्रेत दोन भाविकांचा मृत्यू झाला होता.
अमरनाथ यात्रा
पुन्हा सुरू
जम्मू/श्रीनगर : येथील अमरनाथ यात्रा शनिवारी सहा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली. अतिवृष्टी व प्रतिकूल हवामानामुळे या यात्रेच्या मार्गात अडथळे निर्माण झाले होते. मात्र, ‘हवामान सुधारल्याने बालताल मार्ग सुरू झाला. शनिवारी तेथून एकूण ६,२६९ भाविक मार्गस्थ झाले,’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पहलगाम मार्ग तात्पुरता बंद आहे.
मुख्य सूत्रधार अटकेत
ठाणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता याच्यासह त्याचा साथीदार इंद्रजित विनयकुमार सिंह या दोघांना बिहारच्या समस्तीपूर येथून पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने शनिवारी त्यांना ३० जुलैपर्यंत कोठडी सुनावली.