कारगिलवीरांना सैन्यदलांची मानवंदना

महाराष्ट्र टाइम्स
कारगिलवीरांना सैन्यदलांची मानवंदना
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
कारगिल विजयाच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी कुलाबा मिलिटरी स्टेशन येथे कारगिल युद्धातील वीर जवानांना अभिवादन करण्यात आले. शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून तीनही सेनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

या कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम तळाचे ध्वजाधिकारी व प्रमुख व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन, महाराष्ट्र, गुजरात व गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह तसेच महाराष्ट्र क्षेत्राचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर व्हाइस मार्शल प्रशांत शरद वडोदकर उपस्थित होते. याशिवाय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अधिकारी, माजी सैनिक तसेच विविध मान्यवरांनीही शहीदांना अभिवादन केले.
कारगिल युद्धातील जवानांनी दाखवलेले अद्वितीय शौर्य, सर्वोच्च त्याग आणि राष्ट्रसेवेप्रतीची निष्ठा आजही नव्या पिढीला प्रेरणा देत असून, देशसेवेची सशस्त्र दलांची परंपरा अधिक दृढ करणारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.