Review Of Weather Services At Nagpur Airport Assurance Of Safe Flights
विनाअडथळा उड्डाणांसाठी हवामान सेवांचा आढावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीतील एरोड्रम हवामान कार्यालयाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या हैदराबाद संचालकांनी भेट दिली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह झालेल्या पाहणीदरम्यान सुरक्षित आणि विनाअडथळा विमान उड्डाणांसाठी पुरविण्यात येणाऱ्या हवामान सेवांचा आढावा घेण्यात आला. एरोड्रम हवामान कार्यालय ाचे संचालक डॉ. रिझवान अहमद यांनी शिष्टमंडळाला चोवीस तास सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. वैमानिक, एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स आणि विमान कंपन्यांसाठी आवश्यक हवामान अंदाज, विमानतळ चेतावणी आणि महत्त्वाची माहिती वेळेत पोहोचविण्याच्या प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली. नागपूरचे हे कार्यालय आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र प्राप्त देशातील एकमेव एरोड्रम हवामान कार्यालय असल्याचेही त्यांनी सांगितले. डीजीसीए आणि एएआयच्या अधिकाऱ्यांनी हवामान विभागाच्या सेवांचे कौतुक केले.