तिसऱ्या माळ्यावरून पडून श्रमिकाचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
workplace accident worker falls from third floor and dies
नागपूर : तिसऱ्या माळ्यावरून पडून श्रमिकाचा मृत्यू झाला. ही घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयप्रकाशनगरमधील ओसीएम बिल्डिंग क्रमांक दोन येथे घडली. ओमप्रकाश महेंद्र मिस्त्री (वय ५२, मूळ रा. लकीसराय, बिहार) असे मृताचे नाव आहे. ओमप्रकाश हा फर्निचरचे काम करायचा व बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावर राहायचा. २३ जुलैला त्याने तिसऱ्या माळ्यावर काम केले व तेथेच झोपला. दरम्यान, तो खाली पडून जखमी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच्या सुमारास तो सुरक्षारक्षकाला तो पार्किंगमध्ये जखमी अवस्थेत दिसला. त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.