नसरापूर खुनाची न्यायबाह्य कबुली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या भीमराव कांबळे याच्याविरोधात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुन्हा करून फरारी झालेल्या आरोपीला दोन ग्रामस्थांनी पकडले. त्यावेळी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेतील सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी २३ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.

extrajudicial confession of the accused in nasrapur murder case

पुणे : नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी अटक आरोपीविरोधात बुधवारी सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. गुन्हा करून फरारी झालेल्या आरोपीला दोन ग्रामस्थांनी शोधले. त्या वेळी आरोपीने गुन्ह्याची न्यायबाह्य कबुली दिल्याचे एका साक्षीदाराने सांगितले.

या प्रकरणातील अटक आरोपी भीमराव कांबळे (वय ६५, रा. भोर) याच्याविरोधात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी २३ साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी नोंदविली. बचाव पक्षातर्फे ॲड. हिंमतराव सुर्यवंशी यांनी उलटतपासणी घेतली. तक्रारदार पीडित कुटुंबातर्फे ॲड. मनीष पाडेकर व ॲड. मयूर दोडके यांनी काम पाहिले.