‘सुखना’च्या काठी दोन हजार झाडे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर महापालिका पर्यावरण दिनी सुखना नदीच्या काठावर दोन हजार झाडे लावणार आहे. पावसाळा संपेपर्यंत पन्नास हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी ही माहिती दिली. मान्यवरांना वृक्षारोपणासाठी निमंत्रित केले जाईल. पावसाच्या आगमनानुसार वृक्षारोपणाला गती मिळेल.

municipal corporations decision to plant 5000 trees on environment day at sukna river

छत्रपती संभाजीनगर : पर्यावरण दिनाचे औचित्यसाधत महापालिका शुक्रवारी (५ जून) सुखना नदीच्या काठावर दोन हजार झाडे लावण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. पावसाळा संपेपर्यंत म्हणजे सप्टेबर अखेरपर्यंत पन्नास हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

पर्यावरण दिनी वृक्षारोपण करण्यात येते. त्यानंतर पावसाळा संपेपर्यंत वृक्षारोपण सुरू असते. यंदा सुखना नदीचा काठ आणि सफारी पार्क या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली.

विजय पाटील म्हणाले,‘वृक्षारोपणासाठी मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. जसजसा पाऊस पडेल तसतसे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला गती दिली जाईल.’