बेळगाव : कर्नाटक सरकार करत असलेल्या कन्नड सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
कर्नाटक सरकारने व्यापारी आस्थापने आणि शासकीय कार्यालयावर कन्नड फलक लावण्याची सक्ती केली आहे. भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने आदेश बजावूनदेखील कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीत सरकारी परिपत्रके देत नाही. सगळया बसवर देखील कन्नड फलक असल्याने परगावाहून आलेल्या प्रवाशांची पंचाईत होते. व्यापारी आस्थापनांच्या फलकावर साठ टक्के जागेत कन्नड आणि चाळीस टक्के भाषेत अन्य भाषेत लिहावे असा नियम आहे. असे असतानादेखील कन्नड संघटनाच्या दबावाखाली प्रशासन फलकावर वक्रदृष्टी ठेवत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयावर केवळ कन्नड फलक असल्याने इतरांची पंचाईत होते.





