प्रतीक्षा यादीतील प्रवेश आजपासून

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटीई कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाची प्रतीक्षा यादीतील दुसरी फेरी आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या या जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी ही दुसरी फेरी असून, चार जून ते १२ जून दरम्यान प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. शिक्षण विभागाने या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

rte waitlist admission starts today

छत्रपती संभाजीनगर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्या (आरटीई) नुसार २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीची दुसरी फेरी आज, गुरुवारपासून (चार जून) सुरू होत आहे. आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

आरटीईअंतर्गत जिल्ह्यात मोफत प्रवेशासाठी सोडतीत चार हजार ८६६ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. नियमित फेरीनंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची फेरी सुरू झाली. यामध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी एक फेरी घेण्यात आली. यानंतर दुसऱ्या फेरीसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दुसऱ्या फेरीचे प्रवेश चार जून ते १२ जून दरम्यान होतील, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.