छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी आज, गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. यादरम्यान कोण अर्ज मागे घेणार, याकडे राजकीय मंडळींच्या नजरा लागल्या आहेत.
महायुतीच्या धर्माचे पालन करा, असे निर्देश पक्षनेत्यांनी दिल्याने शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आदेशाचे पालन केले जाईल, असे मुंबईत माध्यमांना सांगितले. त्यामुळे सत्तार यांचे पुत्र समीर अर्ज मागे घेणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





