निवडणुकीपूर्वी उमेदवाराचे निधन झाल्याने रद्द झालेली येथील नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १० ची पोटनिवडणूक दि. २० जून रोजी होत आहे. ‘अ’मध्ये चौरंगी, तर ‘ब’ मध्ये षटकोनी लढत होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निवडणुकीपूर्वी निधन झाल्याने पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी ठाकरे गटाने वाघमारे यांच्या पत्नी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. अर्ज माघारीच्या दिवशी तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने ‘अ’मधून चार, तर ‘ब’मधून सहा उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग १० ‘अ’ अनुसूचित जातीसाठी राखीव असून, राजेंद्र पगारे (शिवसेना), सचिन पगारे (काँग्रेस), ज्योती वाघमारे (ठाकरे गट), सुरेखा मोरे (अपक्ष). तर १० ब सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून, अलका रसाळ (शिवसेना), मुमताज शेख (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), शिफा शेख (ठाकरे गट), आफ्रिन शेख (इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली), सपना पाटील (अपक्ष), शमा शेख (अपक्ष) हे रिंगणात आहेत.





