खोदकामांमध्ये साचले पाणी

Contributed byत्र्यंबकेश्वर|महाराष्ट्र टाइम्स

त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी रस्ते खोदले जात आहेत. या कामांमुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. पहिल्याच पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. फुटलेल्या जलवाहिन्या आणि मलवाहिन्या यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. रात्रीच्या वेळी भाविक या डबक्यांमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांकडून पावसाळ्यात रस्ते खोदकाम न करण्याची मागणी होत आहे.

trembakshwar water accumulated in excavations poses risk of accidents

त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी विकासकामांची सुरुवात झाली आहे. यात रस्त्यांच्या कामांसाठी झालेल्या खोदकामांनी रहदारीला कोंडीत पकडले असताना मंगळवारी सायंकाळी झालेल्या पहिल्याच पावसाने दाणाफाण केली.

त्र्यंबकेश्वर शहरात रस्त्यांचे खोदकाम आणि पाडकाम यांनी मंदिर परिसरात पोहोचणे अवघड झाले आहे. फुटलेल्या जलवाहिन्या आणि मलवाहिन्यांनी बिकट अवस्था झालेली असून, त्यात पावसाच्या पाण्याने आणखी भर घातली आहे. सर्वत्र साचलेले डोह अपघाताला निमंत्रण देत आहेत. रात्रीच्या वेळेला रस्ता शोधणारे भाविक या डबक्यांमधे पडून अपघात होऊ शकतात. पावसाळ्यात नव्याने रस्ते खोदकाम करण्यात येऊ नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.