फुफ्फुस विकार त्यात महाधमनी झडपेचे तोंड अरुंद झाल्याने ७१ वर्षीय रुग्णाची प्रकृती बिघडलेली होती. त्यांचे वजनही कमी होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याचे आव्हान होते. कॅथेटरद्वारे महाधमनी झडप बसविण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (तावी) मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडल्याची माहिती डॉ. सुमित शेजोळ, डॉ. मनीष पुराणिक यांनी दिली.
डॉ. शेजोळ म्हणाले, की रुग्णाच्या महाधमनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम होते. त्यामुळे त्यांना ओपन हार्ट शस्त्रक्रिया नाकारण्यात आली. रुग्णाची ज्याठिकाणाहून शस्त्रक्रिया करावयाची होती त्या पायाची धमनी लहान होती व कॅल्शिअमचे प्रमाण खूप होते. त्यामुळे आधी पायातील धमणीवर इंट्राव्हेस्क्युलर लिथिओट्रिप्सी या तंत्रज्ञानाचा वापर करून धमनी मोठी करण्यात आली. त्यानंतर हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. कारण रुग्णाच्या उजव्या पायाच्या मांडीतील धमनीचा आकारही लहान होता. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मेडिकव्हर हॉस्पिटलचे डॉ. विशाल कुटे यांनी डॉ. सुमित शेजोळ, डॉ. मनीष पुराणिक, डॉ. कुलदीप तोटावार, डॉ. देवेन देशपांडे व टीमचे अभिनंदन केले.



