मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पटेल कुटुंबाच्या तक्रारीवरून धमकीच्या पत्रासंदर्भात गावदेवी पोलिसांत गेल्या वर्षी ९ सप्टेंबर रोजीच तक्रार नोंदवण्यात आली. न्या. पटेल हे काही दिवसांत मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर एफआयआर नोंद होऊन तपासाची शक्यता आहे.

