संघ मुख्यालय उडवण्याचा ई-मेल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह काही महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. या ई-मेलमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संघ मुख्यालय आणि डॉ. हेडगेवार भवन परिसराची कसून तपासणी करण्यात आली. दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. प्राथमिक तपासात धोका नसला तरी तपास पूर्ण होईपर्यंत सुरक्षा यंत्रणा सतर्क राहणार आहे.

bomb threat to rss headquarters

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह काही महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बहल्ला करण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर नागपूरसह राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या ई-मेलची गांभीर्याने दखल घेत संघ मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार भवन परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र, दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. प्राथमिक तपासात कोणताही धोका आढळून आला नसला तरी तपास पूर्ण होईपर्यंत सुरक्षा यंत्रणा सतर्क राहणार आहे.