मोदी यांच्यावर अभिनंदनाचा चौफेर वर्षाव

महाराष्ट्र टाइम्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम केला आहे. या निमित्ताने जगभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष ठराव मंजूर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही पत्राद्वारे अभिनंदन केले. भाजपने विविध मंदिरांमध्ये पूजा-अर्चा केली. मोदी यांनी 'विकसित भारत' आणि राष्ट्रीय सुरक्षेवर भर दिला आहे.

congratulatory torrent for modi

‘लोकशाहीच्या हत्येसाठी जबाबदार असलेले नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात भारतावरील ‘ओझे’ ठरले आहेत,’ असा घणाघाती आरोप काँग्रेसने बुधवारी केला. ‘पंतप्रधान मोदी पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दलच्या त्यांचा ‘आकस व सणक’ यांमुळे आपण मैलाचा दगड गाठल्याचे स्वतःच म्हणत असले, तरी ते प्रत्यक्षात पंडित नेहरू, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना आझाद यांसारख्या महान पुरुषांची कामगिरी पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ असे पक्षनेते जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.

नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वोच्च पंतप्रधान पदावर सलग चार हजार ३९९ दिवस राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल बुधवारी मोदी यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांचे अभिनंदन करणारा विशेष ठराव मंजूर करतानाच, मंत्र्यांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. ‘विकसित भारता’च्या संकल्पनेला पाठिंबा देणारा आणि राष्ट्रीय सुरक्षा, सर्वसमावेशक विकास व सामाजिक न्याय यांसारख्या विषयांमधील मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा करणारा हा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर झाला. एनडीएचे नेते, विविध देशांचे नेते आणि अनेक प्रमुख व्यक्तींनीही मोदी यांचे अभिनंदन केल्याचे सरकारने म्हटले.

‘मोदी यांनी (१९५२ पासून) सलग चार हजार ३९८ दिवस पंतप्रधानपद भूषवणारे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम आज मोडला. यानिमित्ताने भाजप नेत्यांनी दिल्लीच्या विविध मंदिरांमध्ये आरती व पूजापाठ केला,’ असे भाजपने म्हटले आहे.

‘जनसेवा ही सुशासनाची सर्वांत मोठी कसोटी आहे. जो नम्रता, समर्पण आणि कर्तव्यभावनेने सातत्याने काम करतो, तोच जनतेचा विश्वास संपादन करतो. लोकसेवा ही सुशासनाची सर्वांत मोठी कसोटी आहे. नम्रता, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा हे जनतेचा विश्वास संपादन करण्याचे पाया आहे,’ अशा अर्थाचा संस्कृत श्लोक पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्त ‘एक्स’ वर शेअर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान राहण्याचा विक्रम केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास पत्राद्वारे अभिनंदन केले.