अफगाणिस्तानमध्ये पाकचे हल्ले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान सरकारने ही माहिती दिली. पाकिस्तानने मात्र दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात ११ मुलांसह महिला आणि वृद्धांचा मृत्यू झाला. एका पाकिस्तानी हेलिकॉप्टरला अपघात झाला.

अफगाणिस्तानमध्ये पाकचे हल्ले

इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराचे ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टर बुधवारी मुझफ्फराबादजवळ कोसळले. त्यात हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले. मात्र, मृतांची निश्चित संख्या देण्यात आलेली नाही.

पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाल्याचे अफगाणिस्तान सरकारने म्हटले आहे; तर, अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या हल्ल्यात २६ जण ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला.

‘अफगाणिस्तानच्या खोश्त, कुनार, पक्तिका आदी भागांत पाकिस्तानने हवाईहल्ले केले. त्यात ११ मुलांसह एक महिला आणि एका वृद्धाचा मृत्यू झाला,’ असे तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले. अफगाणिस्तानने निवेदन दिल्यानंतर पाकिस्तानने हे हल्ले दहशतवादी तळांवर केल्याचा दावा केला.