अंजलीला व्हायचेय सनदी अधिकारी

Contributed by@timesofindia.com,हर्ष दुधे Harsh.Dudhe@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यातील अंजली सपकाळने गरिबीवर मात करत दहावी परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवले. भाड्याच्या खोलीत राहून, अभ्यासासाठी जागा नसतानाही तिने यश मिळवले. आता तिला इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन सनदी अधिकारी व्हायचे आहे. तिच्या वडिलांना मणक्याचा त्रास असल्याने आईही नोकरी करते. हे कुटुंब रोजगारासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातून पुण्यात आले आहे.

अंजलीला व्हायचेय सनदी अधिकारी

पुणे : भाड्याची केवळ एक खोली आणि त्यातही चार जणांचे कुटुंब असल्याने, अंजली सपकाळ हिला अभ्यास करण्यासाठी मोकळी जागा आणि शांतता नव्हती. पैसे नसल्याने शिकवणी लावण्याचा प्रश्नच नव्हता. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अंजलीने हार न मानता रात्री उशिरापर्यंत घराबाहेरील मोकळ्या जागेत बसून अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवून, पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमधून पहिली येण्याचा मान मिळवला. अंजलीला आता नामांकित कॉलेजमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन, सनदी अधिकारी व्हायचे आहे.

मूळ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावचे सपकाळ कुटुंब रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. वडील संतोष सपकाळ यांच्यावर २०१३मध्ये मणक्याची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर २०१४पासून ते खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. घरखर्च भागत नसल्याने, आई मंजूश्री सपकाळ यांनाही खासगी कंपनीत हेल्पर म्हणून नोकरी करावी लागते. रक्तदाबाचा त्रास असतानाही त्या कुटुंबासाठी मेहनत घेत आहेत.

पुण्यात आल्यापासून हे चौघांचे कुटुंब एका छोट्या खोलीत राहते. त्यासाठी दरमहा साडेचार हजार रुपये द्यावे लागतात. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात असलेल्या याच खोलीत या कुटुंबाचे वास्तव्य आहे. अंजलीने पुणे महापालिकेच्या डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतनमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

 उर्वरित मजकूर...२