भिंत अंगावर पडून चिमुकला दगावला

महाराष्ट्र टाइम्स

हिंगणा मार्गावरील भागीरथी पार्कमध्ये दुर्दैवी घटना घडली. वादळामुळे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली. चार वर्षांचा दैविक आकाश चन्ने याचा मृत्यू झाला. त्याचा १२ वर्षांचा भाऊ अर्जुन चन्ने जखमी झाला. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दैविकचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

four year old boy dies due to falling wall caused by storm

वादळामुळे भिंत अंगावर पडून चारवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला तर त्याचा मोठा भाऊ जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा मार्गावरील भागीरथी पार्क येथे घडली.

दैविक आकाश चन्ने असे मृताचे तर अर्जुन चन्ने (वय १२) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आकाश हे शिक्षक आहेत. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारा दैविक व अर्जुन हे दोघे निर्माणाधीन इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर खेळत होते. याचदरम्यान वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान संरक्षक भिंत दोघांच्या अंगावर कोसळली. या घटनेत दोघे जखमी झाले. दैविक हा गंभीर जखमी झाला. या दोघांनाही तातडीने लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी दैविकचा मृत्यू झाला.

दैविकच्या अशा मृत्यूमुळे चन्ने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.