लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिज्बुल्लाने उत्तर इस्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इस्रायली लष्कराने रविवारी सायंकाळी बैरूतजवळच्या दहिये उपनगरावर क्षेपणास्त्र हल्ला केला.
या घटनेने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाले असून, इस्रायलने बैरूतवर हल्ला करायला नको होते, असे म्हणून ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान, इराणने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी होण्यास काही तास उरले असतानाच ही घटना घडल्याने ट्रम्प संतप्त झाले. ‘बैरूतवर हल्ला करायला नको होता. यामुळे शांतता करार धोक्यात येऊ शकतो. आता हिज्बुल्लासह कोणीही इस्रायलवर आणि इस्रायलने बैरूतवर हल्ला करू नये,’ असे ट्रम्प यांनी बजावले.
बैरूतवर हल्ला करीत असल्याची पूर्वकल्पना अमेरिकेला दिली होती, असे इस्रायली सूत्रांनी ‘सीएनएन’ या वाहिनीला सांगितले.
संबंधित वृत्त...फ्रंट पेज २




