ठाकरेंच्या बैठकीलाचारच खासदार हजर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांची बैठक मातोश्रीवर झाली. या बैठकीला पक्षाच्या नऊ खासदारांपैकी केवळ चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. उर्वरित खासदारांनी ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदारांनी ऑनलाइन उपस्थितीसाठी विविध कारणे दिली.

thackerays mps meeting at matoshree discussion on operation tiger

मुंबई : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ‘ ऑपरेशन टायगर ’च्या चर्चेला चर्चेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाच्या नेतृत्वाने पक्षांच्या खासदारांची मानसिकता तपासण्यासाठी व सद्य राजकीय परिस्थितीवर खासदार व उद्धव ठाकरे यांच्यात मननोकळा संवाद व्हावा यासाठी रविवारी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलाविली. मात्र, या बैठकीला पक्षाच्या नऊ खासदारांपैकी चारच खासदार उपस्थित राहिले. उर्वरित खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. त्यासाठी विविध कारणे खासदारांनी दिली.

 सविस्तर वृत्त...८