नागपूर : पार्किंगमधील पाण्याच्या टाक्यात पडून ८०वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगरमधील स्वप्नील सुजल अपार्टमेंटमध्ये घडली. उषा अरुण खापर्डे असे मृताचे नाव आहे. शनिवारी उषा या मार्निंग वॉकसाठी खाली उतरल्या. यादरम्यान त्या पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत पडल्या. त्यांचा मृत्यू झाला. त्या घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाइकाने अंबाझरी पोलिसांत त्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उषा यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.




