बनावट नोटांद्वारे फसवणुकीचा प्रयत्न

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Times

पुणे : पाचशे रुपयांच्या नोटा खऱ्या असल्याचे भासवून व्यवहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी ओमप्रकाश महावीर अगरवाल (वय ३२, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) आणि मौसम नरेंद्र मिश्रा (वय ३६, रा. लोहगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (१९ जून) दुपारी सुमारे तीन वाजता ढोले पाटील रस्त्यावरील ‘मल्हार टी शॉप’ येथे आरोपी आले. त्यांनी दुकानात सिगारेट खरेदी करून त्यासाठी ५०० रुपयांची नोट दिली. नोट संशयास्पद वाटल्याने दुकानातील कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली आणि ती बनावट असल्याचा संशय व्यक्त केला. तपासादरम्यान आरोपींनी शेजारील ‘युनिक शॉप’मध्येही अशाच प्रकारे ५०० रुपयांची आणखी एक बनावट नोट देऊन सिगारेट खरेदी केल्याचे समोर आले. दुकानदारांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.