सांगवी : नवी सांगवी येथील एस. जे. एच गुरुनानक हायस्कूलमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापिका नंदा काकडे यांनी विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व सांगितले. शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांनी योगा प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाचे नियोजन दर्शना सूर्यवंशी, शोभा मुळीक यांनी केले. शीतल भुजबळ यांनी सूत्रसंचालन व आभार सारिका गांगर्डे यांनी मानले.









