पोटनिवडणुकीत पुन्हासत्ताधाऱ्यांनाच कौल

महाराष्ट्र टाइम्स
पोटनिवडणुकीत पुन्हासत्ताधाऱ्यांनाच कौल
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

तत्कालीन निवडणुकीवेळी उमेदवाराच्या निधनाने स्थगित झालेल्या व शनिवारी (दि. २०) नव्याने घेण्यात आलेल्या मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग १० अ आणि ब च्या पोटनिवडणुकीत मतदारांनी आमदार सुहास कांदे यांच्या विकासाच्या अजेंड्याला पुन्हा एकदा कौल दिला. दोन्ही ठिकाणी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे राजेंद्र पगारे व अलका रसाळ विजयी झाले. यामुळे मनमाड पालिकेत महायुतीच्या बहुमतात आणखी दोन सदस्यांची वाढ झाली.

प्रभाग १० मधील शिवसेना (उबाठा) उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन झाल्याने स्थगित झालेली निवडणूक शनिवारी घेण्यात आली. जवळपास ६८ टक्के मतदान झाले. रविवारी मतमोजणी होऊन या पोटनिवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र पगारे व अलका रसाळ यांनी विजय मिळवला. आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित विजय सोहळ्यात समृद्धी बँकेच्या चेअरमन अंजुम कांदे तसेच युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.