येथील शेतकी संघाच्या १५ जागांसाठी रविवारी (दि.२१) रोजी किरकोळ वाद वगळता शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. येथील या. ना. जाधव महाविद्यालयात तीन मतदान केंद्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात वैयक्तिक गटातील १ हजार २५८ सभासद मतदारांपैकी १ हजार ५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या गटात ८४ टक्के मतदान झाले, तर सोसायटी गटातील १३७ मतदारांपैकी तब्बल १३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.या गटात ९६ टक्के मतदान झाले .
आज, सोमवारी (दि. २२) येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा निबंधक जितेंद्र शेळके यांनी दिली. शेतकी संघाच्या १५ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात उतरले होते.









