जयपूर, दि. २१ (प्रे. ट्र.).
राष्ट्रीय हित नजरेसमोर ठेवून नर्मदा नदीच्या पाण्याचा वापर करण्याबाबत कशी तडजोड करता येईल याचा विचार करण्यासाठी येत्या जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या प्रारंभास मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पाटबंधारे खात्याच्या मंत्र्यांची एक परिषद दिल्लीत बोलाविली जाईल, असे केंद्रीय पाटबंधारेमंत्री फकरुद्दीन अहमद यांनी आज वार्ताहरांना सांगितले.
त्यापूर्वी चारही, राज्यांतील संबंधित इंजिनीअरची एक बैठक जुलैच्या मध्यास राज्याराज्यांत असलेल्या मतभेदांबाबत. इतर तांत्रिक गोष्टींबाबत चर्चा होईल. या चर्चेचा उपयोग मंत्र्यांच्या बैठकीस होऊ शकेल. राजस्थानचे मुख्यमंत्री सुखाडिया आणि आणि पाटबंधारेमंत्री रामप्रसाद लढ् ढा यांच्याशी नर्मदेच्या पाण्याबाबत बोलणी केल्यावर फकरुद्दीन अहमद यानी वरील माहिती वार्ताहरांना सांगितली.
(२२ जून, १९६६)









