पिंपळे गुरव : ‘ योगवेद ’तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व ओंकार उच्चाराने करण्यात आली. त्यानंतर योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्राणायाम व ध्यानाचा सराव केला. या वेळी योग प्रशिक्षक अस्मिता आकडकर, डॉ. दत्तात्रय कोकाटे, नगरसेवक शाम जगताप, सागर आंघोळकर, शांताराम माने उपस्थित होते.










